|| सुस्वागतम ||



ज्योतिष उपासना अवलोकन अनुभूती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे.


ज्योतिषशास्त्र हे वेदाचे एक अंग आहे. दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात . या निर्णयासाठी अनुकूल किवा प्रतिकूल काळ कोणता हे आपल्याला या शास्त्राच्या सहाय्याने कळू शकते. या ब्लॉगवर दिल्या जाणाऱ्या पंचागाच्या व माहितीच्या आधारे आपणास दिवसाचे शुभाशुभत्व आणि दिवसातील चांगला वाईट काळ याचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज येऊ शकतो. तसेच या शास्त्राशी संबंधित समाज गैरसमज , ज्योतिष, अध्यात्म, उपासना व व्यावहारिक तोडगे यावरील लेखमाला व त्या वरील चर्चा आपणास मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगतो.


शुभं भवतु .



आजचा दिनविशेष (०६.०२.२०१२)

दिनांक ०६.०२.२०१२
सूर्योदय (मुंबई) : स. ०७.१३  
सूर्यास्त (मुंबई) : संध्या. ०६.३३  

दधीशंकतृशाराभं  क्षीरोदार्णवसंभवं |
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभुषनम ||

 
पंचांग
तिथी : माघ शु. १४
वार : सोमवार
नक्षत्र : पुनर्वसू (दु. ०२.१० पर्यंत), पुढे पुष्य
योग : प्रीति  (दु. ०२.५१ पर्यंत)  , पुढे आयुष्यमान
करण : गरज (दु. ०५.१५ पर्यंत) पुढे वणिज

शुभाशुभ काळ
राहुकाल (अशुभ) सकाळी स. ०७.३० ते ०९.००   
गुलीककाल  (शुभ) : स. ००१.३० ते ०३.०० 
यम गंड काळ (अशुभ) : दु. १०.३० ते १२.००