|| सुस्वागतम ||



ज्योतिष उपासना अवलोकन अनुभूती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे.


ज्योतिषशास्त्र हे वेदाचे एक अंग आहे. दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात . या निर्णयासाठी अनुकूल किवा प्रतिकूल काळ कोणता हे आपल्याला या शास्त्राच्या सहाय्याने कळू शकते. या ब्लॉगवर दिल्या जाणाऱ्या पंचागाच्या व माहितीच्या आधारे आपणास दिवसाचे शुभाशुभत्व आणि दिवसातील चांगला वाईट काळ याचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज येऊ शकतो. तसेच या शास्त्राशी संबंधित समाज गैरसमज , ज्योतिष, अध्यात्म, उपासना व व्यावहारिक तोडगे यावरील लेखमाला व त्या वरील चर्चा आपणास मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगतो.


शुभं भवतु .



उपासना साधन

||    स्वामी समर्थांची आरती    ||

स्वामी समर्थ स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ |
स्वामी तुमच्या मुळेच आला माझ्या जीवनास अर्थ || धृ |

कलियुगी असंख्यात जाहल्या पापांच्या राशी |
तुमचे भक्त निश्वासती , तुम्ही आहात पाठीशी |
तुम्हावर दृढ भक्ती जडूदे माझी , टाकुनिया स्वार्थ |
स्वामी तुमच्या मुळेच आला माझ्या जीवनास अर्थ || १ ||

स्वामी तुम्हीच सांभाळीता , हा विश्वाचा डोलारा |
येथे तुज भक्तांचे सहजी येते , भाग्य आकारा ||
स्वामी कृपेवाचून तुमच्या होती सर्वही श्रम व्यर्थ |
स्वामी तुमच्या मुळेच आला माझ्या जीवनास अर्थ || २ ||

                                                                 -  दीपक राणे