|| सुस्वागतम ||



ज्योतिष उपासना अवलोकन अनुभूती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे.


ज्योतिषशास्त्र हे वेदाचे एक अंग आहे. दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात . या निर्णयासाठी अनुकूल किवा प्रतिकूल काळ कोणता हे आपल्याला या शास्त्राच्या सहाय्याने कळू शकते. या ब्लॉगवर दिल्या जाणाऱ्या पंचागाच्या व माहितीच्या आधारे आपणास दिवसाचे शुभाशुभत्व आणि दिवसातील चांगला वाईट काळ याचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज येऊ शकतो. तसेच या शास्त्राशी संबंधित समाज गैरसमज , ज्योतिष, अध्यात्म, उपासना व व्यावहारिक तोडगे यावरील लेखमाला व त्या वरील चर्चा आपणास मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगतो.


शुभं भवतु .



आजचा दिनविशेष (१९.०२.२०१२)

दिनांक १९.०२.२०१२
सूर्योदय (मुंबई) : स. ०७.०६
सूर्यास्त (मुंबई) : संध्या. ०६.३९    

जपाकुसुमासंकाशं  काश्यपेयं महाद्युतिं |
तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मी दिवाकरम ||

पंचांग
तिथी : माघ कृ. १३
वार : रविवार
नक्षत्र : उत्तराषाढा (रा. ११.१५ पर्यंत) पुढे श्रवण
योग : व्यतिपात (रा. ११.३७ पर्यंत) पुढे वारीयान
करण : विष्टी ( दु. ०३.५५ पर्यंत) पुढे शकुनी

शुभाशुभ काळ
राहुकाल (अशुभ) सकाळी स. ०४.३० ते ०६.००   
गुलीककाल  (शुभ) : सकाळी ०३.०० ते ०४.३०
यम गंड काळ (अशुभ) : दु. १२.०० ते १.३०