|| सुस्वागतम ||



ज्योतिष उपासना अवलोकन अनुभूती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे.


ज्योतिषशास्त्र हे वेदाचे एक अंग आहे. दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात . या निर्णयासाठी अनुकूल किवा प्रतिकूल काळ कोणता हे आपल्याला या शास्त्राच्या सहाय्याने कळू शकते. या ब्लॉगवर दिल्या जाणाऱ्या पंचागाच्या व माहितीच्या आधारे आपणास दिवसाचे शुभाशुभत्व आणि दिवसातील चांगला वाईट काळ याचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज येऊ शकतो. तसेच या शास्त्राशी संबंधित समाज गैरसमज , ज्योतिष, अध्यात्म, उपासना व व्यावहारिक तोडगे यावरील लेखमाला व त्या वरील चर्चा आपणास मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगतो.


शुभं भवतु .



आजचा दिनविशेष (०१.०२.२०१२)

दिनांक ०१.०२.२०१२
सूर्योदय (मुंबई) : स. ०७.१४    
सूर्यास्त (मुंबई) : संध्या. ०६.३०  

प्रियंगुकालीकाशामं रुपेणाप्रतिमं बुधं |
सौम्यंसौम्यगुणोपेतं तं बुधं
प्रणमाम्यहम ||
 
पंचांग
तिथी : माघ शु. ९ 
वार : बुधवार
नक्षत्र : कृत्तिका
योग : शुक्ल ( दु. ०४.४८ पर्यंत) पुढे ब्रह्मा
करण : बालव (दु. १२.१५ पर्यंत), पुढे कौलव

शुभाशुभ काळ
राहुकाल (अशुभ) सकाळी दु. १२.०० ते ०१.३०
गुलीककाल  (शुभ) : . १०.३० ते १२.००
यम गंड काळ (अशुभ) : . ०७.३० ते ०९.००