|| सुस्वागतम ||



ज्योतिष उपासना अवलोकन अनुभूती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे.


ज्योतिषशास्त्र हे वेदाचे एक अंग आहे. दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात . या निर्णयासाठी अनुकूल किवा प्रतिकूल काळ कोणता हे आपल्याला या शास्त्राच्या सहाय्याने कळू शकते. या ब्लॉगवर दिल्या जाणाऱ्या पंचागाच्या व माहितीच्या आधारे आपणास दिवसाचे शुभाशुभत्व आणि दिवसातील चांगला वाईट काळ याचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज येऊ शकतो. तसेच या शास्त्राशी संबंधित समाज गैरसमज , ज्योतिष, अध्यात्म, उपासना व व्यावहारिक तोडगे यावरील लेखमाला व त्या वरील चर्चा आपणास मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगतो.


शुभं भवतु .



आजचा दिनविशेष (२७.०१.२०१२)

दिनांक २७.०१.२०१२ 
सूर्योदय (मुंबई) : स. ०७.१५  
सूर्यास्त (मुंबई) : संध्या. ०६.२८   

हिमकुंद मृणालाभं, दैतानाम परमंगुरुं |
सर्व शास्त्र प्रवक्तारं, भार्गवं  प्रणमाम्याहम  ||



पंचांग
तिथी : माघ शु. ४ ( दु. ०१.४६ पर्यंत) , पुढे माघ शु. ५
वार : शुक्रवार
नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा ( संध्या. ०६.४७ पर्यंत) , पुढे उत्तरा भाद्रपदा
योग : परिघ (दु. ०१.२७ पर्यंत) पुढे शिव
करण : विष्टी (दु. ०१.४६ पर्यंत), पुढे बव

शुभाशुभ काळ
राहुकाल (अशुभ) सकाळी स. १०.३० ते १२.००
गुलीककाल  (शुभ) : सकाळी ०७.३० ते ९.००
यम गंड काळ (अशुभ) : दु. ०३.०० ते ४.३०