|| सुस्वागतम ||



ज्योतिष उपासना अवलोकन अनुभूती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे.


ज्योतिषशास्त्र हे वेदाचे एक अंग आहे. दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात . या निर्णयासाठी अनुकूल किवा प्रतिकूल काळ कोणता हे आपल्याला या शास्त्राच्या सहाय्याने कळू शकते. या ब्लॉगवर दिल्या जाणाऱ्या पंचागाच्या व माहितीच्या आधारे आपणास दिवसाचे शुभाशुभत्व आणि दिवसातील चांगला वाईट काळ याचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज येऊ शकतो. तसेच या शास्त्राशी संबंधित समाज गैरसमज , ज्योतिष, अध्यात्म, उपासना व व्यावहारिक तोडगे यावरील लेखमाला व त्या वरील चर्चा आपणास मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगतो.


शुभं भवतु .



आजचा दिनविशेष (२८.०१.२०१२)

दिनांक २८.०१.२०१२
सूर्योदय (मुंबई) : स. ०७.१५ 
सूर्यास्त (मुंबई) : संध्या. ०६.२८ 

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम |
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम   ||


पंचांग
तिथी : माघ शु. ५ ( दु. ०३.२९ पर्यंत) , पुढे माघ शु. ६
वार : शनिवार
नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा (रा. ०९.२६ पर्यंत) पुढे रेवती
योग : शिव ( दु. ०१.३७ पर्यंत) पुढे सिद्ध
करण : बालव (दु. ०३.२९ पर्यंत) पुढे कौलव

शुभाशुभ काळ
राहुकाल (अशुभ) सकाळी स. ०९.०० ते १०.३०  
गुलीककाल  (शुभ) : सकाळी ०६.०० ते ०७.३०
यम गंड काळ (अशुभ) : दु. ०१.३० ते ३.००