|| सुस्वागतम ||



ज्योतिष उपासना अवलोकन अनुभूती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे.


ज्योतिषशास्त्र हे वेदाचे एक अंग आहे. दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात . या निर्णयासाठी अनुकूल किवा प्रतिकूल काळ कोणता हे आपल्याला या शास्त्राच्या सहाय्याने कळू शकते. या ब्लॉगवर दिल्या जाणाऱ्या पंचागाच्या व माहितीच्या आधारे आपणास दिवसाचे शुभाशुभत्व आणि दिवसातील चांगला वाईट काळ याचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज येऊ शकतो. तसेच या शास्त्राशी संबंधित समाज गैरसमज , ज्योतिष, अध्यात्म, उपासना व व्यावहारिक तोडगे यावरील लेखमाला व त्या वरील चर्चा आपणास मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगतो.


शुभं भवतु .



आजचा दिनविशेष (२४.०१.२०१२)

दिनांक २४.०१.२०१२
सूर्योदय (मुंबई) : स. ०७.१५   
सूर्यास्त (मुंबई) : संध्या. ०६.२६

धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कांतीसमप्रभं ||
कुमारंशक्ती  हस्तंच मंगलं प्रणमाम्यहम  || 
 
पंचांग
तिथी : माघ श. प्रतिपदा (दु. १२.२५ पर्यंत) पुढे माघ शु. २
वार : मंगळवार
नक्षत्र : श्रवण ( दु. ०३.२८ पर्यंत) पुढे धनिष्ठा
योग : सिद्धी (दु. ०३.५१ पर्यंत) पुढे  व्यतिपात
करण : बव (दु. १२.२५ पर्यंत) पुढे बालव

शुभाशुभ काळ
राहुकाल (अशुभ) सकाळी दु. ०३.०० ते ०४.३०    
गुलीककाल  (शुभ) : दु. १२.०० ते ०१.३०
यम गंड काळ (अशुभ) : . ०९.०० ते १०.३०