|| सुस्वागतम ||



ज्योतिष उपासना अवलोकन अनुभूती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे.


ज्योतिषशास्त्र हे वेदाचे एक अंग आहे. दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात . या निर्णयासाठी अनुकूल किवा प्रतिकूल काळ कोणता हे आपल्याला या शास्त्राच्या सहाय्याने कळू शकते. या ब्लॉगवर दिल्या जाणाऱ्या पंचागाच्या व माहितीच्या आधारे आपणास दिवसाचे शुभाशुभत्व आणि दिवसातील चांगला वाईट काळ याचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज येऊ शकतो. तसेच या शास्त्राशी संबंधित समाज गैरसमज , ज्योतिष, अध्यात्म, उपासना व व्यावहारिक तोडगे यावरील लेखमाला व त्या वरील चर्चा आपणास मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगतो.


शुभं भवतु .



आजचा दिनविशेष (२२.०१.२०१२)

दिनांक २२.०१.२०१२
सूर्योदय (मुंबई) : स. ०७.१५
सूर्यास्त (मुंबई) : संध्या. ०६.२९  

जपाकुसुमासंकाशं  काश्यपेयं महाद्युतिं |
तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मी दिवाकरम ||

पंचांग
तिथी : पौष कृ. १४ ( दु. ०२.१९ पर्यंत) , पुढे अमावस्या
वार : रविवार
नक्षत्र : पूर्वाषाढा ( दु. ०४.०१ पर्यंत) , पुढे उत्तराषाढा
योग : हर्षण (संध्या. ०७.३९ पर्यंत)  , पुढे वज्र 
करण : शकुनी ( दु. ०२.१९ पर्यंत) , पुढे चतुष्पाद

शुभाशुभ काळ
राहुकाल (अशुभ) सकाळी स. ०४.३० ते ०६.००   
गुलीककाल  (शुभ) : सकाळी ०३.०० ते ०४.३०
यम गंड काळ (अशुभ) : दु. १२.०० ते १.३०