|| सुस्वागतम ||



ज्योतिष उपासना अवलोकन अनुभूती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे.


ज्योतिषशास्त्र हे वेदाचे एक अंग आहे. दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात . या निर्णयासाठी अनुकूल किवा प्रतिकूल काळ कोणता हे आपल्याला या शास्त्राच्या सहाय्याने कळू शकते. या ब्लॉगवर दिल्या जाणाऱ्या पंचागाच्या व माहितीच्या आधारे आपणास दिवसाचे शुभाशुभत्व आणि दिवसातील चांगला वाईट काळ याचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज येऊ शकतो. तसेच या शास्त्राशी संबंधित समाज गैरसमज , ज्योतिष, अध्यात्म, उपासना व व्यावहारिक तोडगे यावरील लेखमाला व त्या वरील चर्चा आपणास मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगतो.


शुभं भवतु .



आजचा दिनविशेष (३१ -१२-२०११)

दिनांक ३१ -१२-२०११
सूर्योदय (मुंबई) : स. ०७.१२
सूर्यास्त (मुंबई) : संध्या. ०६.१० 

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम |
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम   ||


पंचांग
तिथी : पौष शु. ७  ( रा. १०.३६ पर्यंत) , पुढे पौष शु. ८ 
वार : शनिवार
नक्षत्र : पू. भाद्रपदा (स. १०.०४ पर्यंत) , पुढे उ. भाद्रपदा
योग : वरीया
करण : गरज (स. ०९.३५ पर्यंत), वणिज (रा. १०.३६ पर्यंत), पुढे विष्टी

शुभाशुभ काळ
राहुकाल (अशुभ) सकाळी स. ०९.०० ते १०.३०  
गुलीककाल  (शुभ) : सकाळी ०६.०० ते ०७.३०
यम गंड काळ (अशुभ) : दु. ०१.३० ते ३.००