|| सुस्वागतम ||



ज्योतिष उपासना अवलोकन अनुभूती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे.


ज्योतिषशास्त्र हे वेदाचे एक अंग आहे. दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात . या निर्णयासाठी अनुकूल किवा प्रतिकूल काळ कोणता हे आपल्याला या शास्त्राच्या सहाय्याने कळू शकते. या ब्लॉगवर दिल्या जाणाऱ्या पंचागाच्या व माहितीच्या आधारे आपणास दिवसाचे शुभाशुभत्व आणि दिवसातील चांगला वाईट काळ याचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज येऊ शकतो. तसेच या शास्त्राशी संबंधित समाज गैरसमज , ज्योतिष, अध्यात्म, उपासना व व्यावहारिक तोडगे यावरील लेखमाला व त्या वरील चर्चा आपणास मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगतो.


शुभं भवतु .



|| सुस्वागतम ||

ॐ असतोमा सद्गमय ।
तमसोमा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मामृतं गमय ।।
ॐ शान्ति शान्ति शान्तिः ।।
                               
– बृहदारण्यक उपनिषद् 1.3.28.
हे ईश्वरा मला असत्यापासून सत्याकडे ने, अंधाराकडून प्रकाशाकडे ने आणि मृत्युपासून अमरत्वाकडे ने 

बृहदारण्यक उपनिषदातील या श्लोकाद्वारे ईश्वराला प्रार्थना करून आपण सुरवात करूया. या ब्लॉगवर तुम्ही रोजचा दिनविशेष पाहू शकता व त्या अनुषंगाने आपले निर्णय घेऊ शकता . आपण ज्योतिष, अध्यात्म, उपसना , व्रत-वैकल्ये , उपाय, तोडगे आणि या सर्वांची आधुनिक जीवनशैलीशी सांगड यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करणार आहोत. माझी आपल्याला विनंती आहे कि आपण या चर्चेत सहभागी व्हा. सर्वाना उपयोगी असणारे विषय आपण थेट हाताळू. वैयक्तिक प्रश्नांसाठी मला jyotish.upasana@gmail.com वर इ-मेल करा .